Had gone to a musical programme by Sandeep Khare and Dr. Salil Kulkarni the other day. I have always loved their songs. Especially Snadeep Khare’s poetry… here are a few of my favourites…hope everyone can understand them. I tried translating, but it just ends up sounding silly.
This one is dedicated to all the emotional freaks like me..
आताशा.. असे हे.. मला काय होते!!!
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते…..
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो…
कशी शांतता , शून्य शब्दांत येते…….
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!
कधी दाटु येता , पसारा घनांचा….
कसा सावला रंग , होतो मनाचा…
असे हालते .. आत हलुवार काही…
जसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा….
असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा …
क्षणी व्यरथ होतो … दीशांचा पसारा…
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या… मागु जातो कीनारा….
न अंदाज कुठले.. न अवधान काही….
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही….
कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे…
कीती खोल जातो, तरी तोल जातो…
असा तोल जाता.. कुणी सावरावे….
आताशा .. असे हे ..मला काय होते ….
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते….
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते…
आताशा असे हे मला काय होते ….
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते…..
This one to all those who live life as it comes and face everything on its face…
जपत किनारा शीड सोडणे – नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे – नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे – नामंजूर!
मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे – नामंजूर!
माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे – नामंजूर!
रुसवे – फ़ुगवे… भांडणतंटे… लाख कळा
आपला – तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्हाणे – नामंजूर!
नीती, तत्वे… फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे – नामंजूर!
And the last one.. dedicated to everyone who have watched their loved ones leave, and said a goodbye, in hope of seeing them again sooner rather than later… and wishing things never change
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला
हे भलते अवघड असते… हे भलते अवघड असते…
कुणी प्रचंड आवडणारे… ते दूर दूर जाताना…
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना…
डोळ्यातील अडवून पाणी… हुंदका रोखुनी कंठी…
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते…
तरी असतो पकडायाचा… हातात रुमाल गुलाबी…
वार्यावर फडकवताना… पाह्यची चालती गाडी…
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली…
गजरा माळावा इतुके… ती सहज अलविदा म्हणते…
तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू…
इतक्यात म्हणे ती – माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते… मग सहजच हळवी होते…
गजर्यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते…
कळते की गेली वेळ… ना आता सुटणे गाठ…
आपुल्याच मनातील स्वप्ने… घेऊन मिटावी मूठ…
ही मूठ उघडण्यापूर्वी… चल निघुया पाऊल म्हणते…
पण पाऊल निघण्यापूर्वी… गाडीच अचानक निघते…
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी…
ओठावर शीळ दिवाणी… बेफिकीर पण थरथरती…
पण क्षण क्षण वाढत असते… अंतर हे तुमच्यामधले…
मित्रांशी हसतानाही… हे दु:ख चरचरत असते…